corona Jalgaon | जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात; ५५ दिवसांनंतर शून्य रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात; ५५ दिवसांनंतर शून्य रुग्ण

जळगाव जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात; ५५ दिवसांनंतर शून्य रुग्ण

जळगाव : डिसेंबरअखेर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल ५५ दिवसांनी रविवारी (ता.२०) जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण समोर आलेला नाही. या दिलासादायक नोंदीमुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे मानले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेतील तीव्रतेनंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दुसरी लाट पूर्णपणे आटोक्यात आली. डिसेंबरमध्ये जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आणि डिसेंबरअखेर सलग तीन दिवस जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

ओमिक्रॉनचा धोका

त्याच दरम्यान राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला. देशात व राज्यात ओमिक्रॉनसोबत जुन्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले. जळगाव जिल्ह्यातही जानेवारीपासून तिसरी लाट सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले.

महिनाभरातच संसर्ग आटोक्यात

जानेवारीच्या मध्यांतरात दररोज जिल्ह्यात चारशे ते पाचशे नव्या रुग्णांची नोंद होऊ लागली. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या १५ हजारांवर जाईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली. मात्र, सुदैवाने तसे झाले नाही. आणि जानेवारीअखेर पुन्हा ही लाट ओसरु लागली. आता फेब्रुवारीत तर संसर्ग पूर्ण नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.

५५ दिवसांनंतर शून्य रुग्ण

याआधी जळगाव जिल्ह्यात २७ डिसेंबर २०२१ला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल ५५ दिवसांनी रविवारी (ता.२०) जिल्ह्यात एकही रुग्णाची नोंद आढळून आलेली नाही. गेल्या डिसेंबरमध्ये २५, २६ व २७ तारखेला असे सलग तीन दिवस जिल्ह्यात एकही नवा रुग्ण नोंदला गेला नव्हता. रविवारी चारशेवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तर दिवसभरात १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता अवघी ६८ राहिली आहे.

रविवारची आकडेवारी अशी

  • नवे रुग्ण : ००

  • कोरोनामुक्त: १४

  • सक्रिय रुग्ण : ६८

  • लक्षणे असलेले : ०५

  • लक्षणे विरहित : ६३

  • आयसीयूत : ०३

Web Title: Corona Infection Under Control Jalgaon District Zero Patient

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top