esakal | इंजेक्शन काळ्या बाजारात जळगाव प्रमुख केंद्र; रेमडेसीव्हीर १० हजारांत, ‘टोसी’ लाखांत!    

बोलून बातमी शोधा

इंजेक्शन काळ्या बाजारात जळगाव प्रमुख केंद्र; रेमडेसीव्हीर १० हजारांत, ‘टोसी’ लाखांत!     

राज्यातून इंजेक्शनची मागणी वाढल्याने काळा बाजारुंना रान मोकळे होऊन जिल्ह्यातील साठा इतरत्र वळता झाल्याने आठच दिवसात इंजेक्शनचा मोठा तुटवडा झाला आहे.

इंजेक्शन काळ्या बाजारात जळगाव प्रमुख केंद्र; रेमडेसीव्हीर १० हजारांत, ‘टोसी’ लाखांत!    

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव  : कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या इंजेक्शन, औषध वितरणावर प्रशासनाने नियंत्रण मिळविल्याचा कितीही दावा केला तरी रेमडेसीव्हिर दहा हजारांवर तर टोसलीझुमॅब इंजेक्शनचा दर लाखावर पोचल्याचे बोलले जात आहे. दुर्दैवाने जळगाव जिल्हा या काळ्या बाजाराचे प्रमुख केंद्र बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. 

आवर्जून वाचा- कोरोनाचा उद्रेक सुरुच.. जळगाव जिल्ह्यात बळींची संख्या अठराशे पार  ​

सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता प्रचंड वाढत आहे. बाधित रुग्णांमध्ये प्रत्येक तिसऱ्या रुग्णाला श्‍वासोत्सवाचा त्रास आहेच. श्‍वासाचा थोडाही त्रास किंवा धाप लागण्याचा प्रकार आढल्यास रेमडेसीव्हिर हे प्रमुख इंजेक्शन म्हणून त्याचा वापर करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ५ हजार ७०० छापील किंमतीवर सहजासहजी उपलब्ध रेमडेसीव्हिर नंतर बारा-चौदाशेत आणि समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने ८०० रुपयांत मिळू लागले. 
आठवडाभरात राज्यातून इंजेक्शनची मागणी वाढल्याने काळा बाजारुंना रान मोकळे होऊन जिल्ह्यातील साठा इतरत्र वळता झाल्याने आठच दिवसात इंजेक्शनचा मोठा तुटवडा झाला आहे. 


आणि काळा बाजार सुरु 
प्रशासनाचे नियंत्रण व संस्थांच्या सहकार्याने रेमडेसीव्हिर स्वस्तात मिळू लागल्यानंतर त्याचा काळा बाजार सुरु झाल्याचे समोर आले. आतातर उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढल्याचे शासन, प्रशासनच सांगू लागल्याने हे इंजेक्शन १० हजारांतही मिळेनासे झाले. 

‘टोसी’चेही ‘ब्लॅक’ 
मध्यम संक्रमित किंवा गंभीर होत असलेल्या रुग्णांना ६ रेमडीसिव्हीरचा स्टॅण्डर्ड डोस‌ ठरला आहे. तरी प्रकृती नियंत्रणात येत नसेल तर ॲक्टेमेरा (४०० एम.जी./२० एम.एल)चा मार्ग डॉक्टर अवलंबतात. मुळात ४० हजार ५४५ छापील किंमतीचे या इंजेक्शनचाही जिल्‍ह्‍यात मोठ्या प्रमाणावर तुटवडा झाला आहे. १लाख ते १ लाख २० हजारांपर्यंत या इंजेक्शनचा दर पोचल्याचे सांगितले जातेय. 

आवर्जून वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 


एक अमृत दुसरे ब्रम्हास्त्र 
कोरोनात फुफूसावर विषाणूचे संक्रमण वाढून फुफुस कोरडे होण्यास सुरवात होते, तत्पुर्वीच रेमडीसीव्हीरचे डोस्‌ देण्यात येतात. ६ इंजेक्शनचा स्टॅर्ण्ड डोस आहे. रेमडीसीव्हीर आता पर्यंतच्या उपचारात कोरोना बाधीतासाठी अमृत गणले गेले. रुग्णाची प्रकृती प्रतिसाद देत नसेल तर रेमडीसीव्हीर सोबतच टोसी (टोसीलीझुमॅब ॲक्टेमंरा(४०० एम.जी./२० एम.एल) देण्यात येते. तीन रेमडीसीव्हीर झाल्यावर १ टोसी आणि सहा झाल्यावर दुसरे असा डोस रुग्णाच्या प्रतिसादावर औलंबून आहे. वाढती रुग्णसख्या, मृत्यु दर बघता प्रत्येक तिसऱ्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचे..विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. 

संपादन- भूषण श्रीखंडे