कोरोनाचा कहर सुरूच;  तिघा तरुणांसह 15 जणांचा मृत्यु

कोरोनाचा कहर सुरूच;  तिघा तरुणांसह 15 जणांचा मृत्यु

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संर्सग वाढत असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱय रुग्णांचा आलेख वातच आहे. आज देखील गेल्या २४ तासात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन तरुणांचा समावेश आहे. गेल्या १६ दिवसांपासून रोजची रुग्णसंख्या हजार, अकराशेने वाढत असून, शुक’वारी (ता. २) नव्या बाधितांच्या पेक्षा अधिक रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना आजार झपाट्याने वाढत असून सलग १६ व्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा हजारांची संख्या पार करून गेला. गेल्या २४ तासांत नवे एक हजार १४२ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९१ हजार ३२७ वर पोचली. तर एकाच दिवसात आतापर्यंतचे विक्रमी म्हणजे एक हजार २२२ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा ७७ हजार ९५६वर पोचला आहे. गेल्या काही दिवसांत चाचण्यांची संख्या वाढली असून, त्या तुलनेत बाधितांचा आकडा कायम आहे. तसेच आज ९ हजार ६५२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. 
 

जळगावात ६ मृत्यू 
जिल्ह्यात २४ तासांत १५ जणांचा बळी गेला. त्यापैकी जळगाव शहरात सहा जणांचा समावेश आहे. त्यात पाच महिलांचा समावेश असून दोन तरुणींचा समावेश आहे. तर ७७  वर्षीय वृध्द पुरुषाचा समावेळ आहे.  शहरात आतापर्यंत ३९३ मृत्यू झाले असून, जिल्ह्यातील बळींचा आकडा एक हजार ६५३ झाला आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहरात आज आरटीपीसीआर चाचण्यांच्या अहवालातून २४९ रुग्ण समोर आले. तर दिवसभरात शहरातील ४४२ जण बरे झाले. रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. जळगाव ग्रामीण ३६, भुसावळ तालुका १६९, अमळनेर ७६, चोपडा ११५, पाचोरा ४३, भडगाव ३७, धरणगाव ४३, यावल ६५, एरंडोल ५४, जामनेर १३, रावेर २७, पारोळा ५७, चाळीसगाव ६८, मुक्ताईनगर ५७, बोदवड २९, अन्य जिल्ह्यातील ३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com