भाजप आमदार सुरेश भोळेंना कोरोनाची लागण; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

भाजप आमदार सुरेश भोळेंना कोरोनाची लागण; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

जळगाव ः भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचा कोरोचा अहवाल पाॅझेटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचची करून स्वःताची काळजी घ्यावी असे आमदार भोळे यांनी आवाहन केले आहे. 

जळगाव शहरात कोरोना संसर्ग अतिशेय वेगात पसरत असून आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 

कोरोनाचे रुग्ण वाढले
जळगाव जिल्ह्यायातील कोरोना रुग्णांचा आकडा साठ हजार पार झाला असून अतिशय चिंतेची ही बाब आहे. महापालिका प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई केली जात असून कोरोना सुरक्षेचे नियम पाळत नसल्यांवर दंडात्मक कारवाई करून संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

तिन दिवसापूर्वी बैठक

भारतीय जनता पार्टीची वसंत स्मृती पक्ष कार्यालयात तीन दिवसापूर्वी  बैठक झाली होती. या बैठकीत आमदार सुरेश भोळे देखिल उपस्थित होते. त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com