जळगाव जिल्ह्यात नविन २८८ नवीन कोरोना बाधित 

जळगाव जिल्ह्यात नविन २८८ नवीन कोरोना बाधित 

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असून शनिवारी रुग्णांचा संख्या २८८ आली आहे. तर १५६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहे तर एक कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आसून तीन दिवसांपासून तीनशे पार आकडा समोर येत असून, आज सुमारे १ हजार ८०० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात २८८ रुग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६० हजार ४७० झाली. दिवसभरात १५६ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडा ५६ हजार ८४५वर पोचला. 

जळगाव शहरात कहर सुरूच 
जिल्ह्यातील रुग्णसंख्येत जळगाव शहरातील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. शनिवारीही जळगावात १३९ रुग्ण आढळून आले. चोपडा तालुक्यात १५, एरंडोल २२, चाळीसगाव- १७, भुसावळ- १४, धरणगाव- ३, रावेर- २, मुक्ताईनगर- ८, पारोळा- २, जळगाव ग्रामीण- ८, अमळनेर- ८, जामनेर- १५, भडगाव- ११, बोदवड- २, अन्य जिल्ह्यांतील सात रुग्ण आढळून आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com