कोविडच्या ‘आरटीपीसीआर’चाचण्या वाढवा; अन्यथा होणार कारवाई ! 

देविदास वाणी | Tuesday, 12 January 2021

कोरोना बाबत आपल्या कार्यक्षेत्रास दिलेल्या उद्दिष्टाइतक्या चाचण्यांची संख्या साध्य होईल या दृष्टीने नियोजन आणि कार्यवाही करावी.

जळगाव ः जिल्ह्यात कोविडचे रुग्ण कमी असले तरी रोज नवीन रुग्ण आढळत आहे. जेवढे रुग्ण आढळतील तेवढ्या लवकर त्यांच्यावर उपचार करून त्यांना कोविडपासून वाचविले जाईल असे जिल्हा प्रशासनाला वाटते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी आरोग्य यंत्रणांना रोज दोन हजारांवर आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. 

आवश्य वाचा- चक्क आयुक्तांना मोकाट कुत्र्यांची दिली भेट; कोणी केले असे ? वाचा सविस्तर !

नगरपालिका क्षेत्रातील सर्वच आरोग्य यंत्रणांच्या दररोजच्या आरटीपीसीआर चाचण्या घेणे कमी झाले आहे. त्या वाढविण्याची गरज आहे. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संपुर्ण कालावधीमध्ये घरोघरी भेटीद्वारे सर्वेक्षण करुन तसेच स्थानिक वैद्यकिय व्यवसायिकांच्या मदतीने लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद करावी. त्यांच्या कोविड चाचण्या कराव्यात.

Advertising
Advertising

जास्त संपर्कात येणाऱ्यांच्या चाचण्या करा

जननतेशी मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या व्यक्‍तींचे चाचण्या करा. यात भाजी विक्रेते, किराणा, दुकानदार, फळविक्रेत्ते यांची कोविड-१९ चाचणी करण्यात यावी. त्यासोबत इतर व्यक्तींची सुध्दा चाचणी करण्याच्या सुचना दिल्या आहे.  

आवश्य वाचा- पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार
 

दररोज दोन हजाराच्या वर चाचण्या करा 

भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा या नगरपालिका 
क्षेत्रात दैनंदिन १५० चाचण्या कराव्यात. या व्यतिरिक्त इतर नगरपालिका क्षेत्रांत दैनंदिन १०० चाचण्या कराव्यात. जिल्ह्यात दररोज २०७० कोरोना चाचण्या होणे गरजेचे आहे.

 

अन्यथा कारवाई..

कोरोना बाबत आपल्या कार्यक्षेत्रास दिलेल्या उद्दिष्टाइतक्या चाचण्यांची संख्या साध्य होईल या दृष्टीने नियोजन आणि कार्यवाही करावी. नियोजन व त्याच्या अंमलबजावणीत कुठल्याही प्रकारे ढिलाई होऊ नये याची दक्षता वैयक्‍तीकरित्या घ्यावी. अन्यथा पुढील होणाऱ्या प्रशासकीय कारवाईस आपण स्वतः जबाबदार असाल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे