जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढतोय; जळगाव, चोपडा, अमळनेरला रुग्ण संख्या वाढली 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढतोय; जळगाव, चोपडा, अमळनेरला रुग्ण संख्या वाढली 

जळगाव : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, जळगाव शहरासह चोपडा, अमळनेर देखील ‘हॉटस्पॉट’ बनत चालले आहे. सलग चार-पाच दिवसापासून शंभरीपार रुग्ण आढळत आहे. आज जिल्ह्यात १४६ रुग्ण आढळून आले. पैकी तब्बल ७८ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. 

सप्टेंबरपासून नियंत्रणात आलेला कोरोना गेल्या दहा- ते पंधरा दिवसापासून पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दररोजची संख्या वाढत आहे. आज १४६ रुग्ण आढळून आले असून त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५८ हजार ३१९ झाली आहे. तर दिवसभरात केवळ ४६ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५६ हजार ७० झाला आहे. रुग्ण वाढत असतांना दोन दिवसांपासून एकाही मृत्यू झाला नव्हता आज मात्र एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव, चोपडा, अमळनेरला धोका 
जळगाव शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याचा धोका वाढतोय. शहर पुन्हा हॉटस्पॉट बनण्याच्या अवस्थेत आहे. तसेच आता ग्रामीण भागात पून्हा कोरोना वाढत असून चोपडा, अमळनेर मध्ये आज कोरोनाचा रुग्ण आढळून आले आहे. 

...असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- ७८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ- ०२, अमळऩेर १८, चोपडा २०, एरंडोल ३, जामनेर २, रावेर ४, चाळिसगाव ४, मुक्ताईनगर ८, तर पाचोरा, धरणगाव प्रत्येकी एक तर इतर जिल्ह्यातील १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com