जळगावमध्ये मृत्युचे तांडव सुरूच; दिवसभरात २१ बळी 

मृत्युबाबतची चिंता वाढविणारा म्हणजे संसर्गाच्या दोन्ही लाटेतील सर्वाधिक २१ मृत्यू नोंदले गेले.
जळगावमध्ये मृत्युचे तांडव सुरूच; दिवसभरात २१ बळी 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना बुधवारचा दिवस एकीकडे चिंता वाढविणारा तर दुसऱ्या बाजूला दिलासा देणारा ठरला. गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे २१ जणांच्या मृत्युची नोंद झाली. तर गेल्या १५ दिवसांत प्रथमच नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या आत म्हणजे ९८४ एवढा नोंदला गेला.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या स्थिर होती. मात्र, सोबतच रोजचे मृत्यूही कायम असल्याने मृत्यूदरही कमी होत नव्हता. बुधवारी तर मृत्युबाबतची चिंता वाढविणारा म्हणजे संसर्गाच्या दोन्ही लाटेतील सर्वाधिक २१ मृत्यू नोंदले गेले. त्यामुळे बळींचा आकडा १८४८वर पोचला आहे. बुधवारी रॅपिड ॲन्टीजेनच्या ६५५२ व आरटीपीसीआरच्या ११५१ अशा एकूण ७७०३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.

रुग्णसंख्येचा दिलासा

दुसरीकडे गेल्या १५ दिवसांपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या हजार, अकराशे व अगदी तीनवेळा तर बाराशेच्या वर गेली. बुधवारी मात्र ९८४ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ५ हजार १३६वर पोचली. तुलनेत बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक म्हणजे ११९५ होता. बरे होणाऱ्यांची संख्याही ९१ हजार ६९९ झाली आहे.

जळगावात तब्बल ७ मृत्यू

जळगाव शहरात रुग्णवाढ व मृत्युची संख्या जास्त आहे. बुधवारी शहरातील ७ जणांचा बळी गेला. त्यापैकी तब्बल ४ जण ३० ते ४० वयोगटातील तरुण होते, ही बाब चिंताजनक म्हटली पाहिजे. शहरात बुधवारी २११ नवे रुग्ण समोर आले, तर तुलनेत २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

अन्य ठिकाणी असे आढळले रुग्ण

जळगाव ग्रामीण ७५, भुसावळ ७८, अमळनेर ३७, चोपडा १२, पाचोरा १७, भडगाव ३४, धरणगाव ४६, यावल ६७, एरंडोल ७३, जामनेर २०, रावेर ८६, पारोळा ६, चाळीसगाव ५९, मुक्ताईनगर १५८, अन्य जिल्ह्यातील ५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com