esakal | जळगावात कोरोनाचे नियम होणार ‘कडक’; लग्न, सभांमध्ये छापे टाकले जाणार 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावात कोरोनाचे नियम होणार ‘कडक’; लग्न, सभांमध्ये छापे टाकले जाणार 

कोरोनोला अटकाव करायचा असेल तर नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई, दंड करणे हाच उपाय आहे. तो करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.

जळगावात कोरोनाचे नियम होणार ‘कडक’; लग्न, सभांमध्ये छापे टाकले जाणार 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला तब्बल एक हजार बेड तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यादृषटीने आरोगय विभागाने बेड सज्ज ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पोलिस, महापालिका, पालिका प्रशासन कोरोनोचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. 

आवश्य वाचा- बापरे ! बँकतील कर्मचाऱ्यांना झाला कोरोना; आणि शहरात उडाली एकच खळबळ
 

शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सलग दोन दिवसांपासून १५० वर आहे. कोरोनोचे नियम न पाळल्याने (मास्क विना फिरणे,सामाजीक अंतर न ठेवणे, गर्दीत जाणे, वारंवार हात न धुणे) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनोला अटकाव करायचा असेल तर नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई, दंड करणे हाच उपाय आहे. तो करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्याबाबतचे आदेश पालिका, महापालिका, गटविकास अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. 

वाचा- अखेर सुप्रीम कॉलनीला मिळाले सुरळीत पाणी!
 

लग्नात केवळ पन्नास वऱ्हाडी हवे
लग्नात केवळ पन्नास म्हणजे पन्नासच वऱ्हाडी असणे आवश्यक आहे. तेथेही सामाजीक अंतर, मास्क लावणे गरजेचे आहे. लग्न सोहळ्यामधून, सभा कार्यक्रमांमधून कोरोना स्प्रेड होत असल्याने हे र्निबंध आहेत. यामुळे मंगल कायालये, लग्न मंडप, सभामध्ये अचानक छापे टाकण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image