जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा गंभीर रुग्णाची संख्या घटली; आज नवे ३५ बाधित

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा गंभीर रुग्णाची संख्या घटली; आज नवे ३५ बाधित

जळगाव :  कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर साधारणतः: जूनपासून म्हणजे गेल्या आठ महिन्यांत प्रथम जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आली आहे. मंगळवारी (ता. ९) ऑक्सिजनवर असलेले २५ तर आयसीयूत दाखल २२ असे ४७ गंभीर रुग्ण होते. 

जिल्ह्यात मार्चच्या अखेरीस पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर मे- जूनमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून रुग्णसंख्या नियंत्रणाबाहेर गेली. तेव्हापासून सातत्याने सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढत गेली आणि अक्षरशः: रुग्णांना बेडही कमी पडू लागले. जिल्ह्यात अकरा हजारांपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या पोचली होती, त्याचवेळी गंभीर रुग्णांचा आकडाही पंधराशेवर पोचला होता. 

गंभीर रुग्ण घटले 
सप्टेंबरच्या १७ तारखेपासून जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. जानेवारीत तर दररोज सरासरी वीसच्या घरात रुग्ण आढळत होते. फेब्रुवारीत ते प्रमाण काहीसे वाढले असले तरी नियंत्रणात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २५ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण आयसीयूमध्ये म्हणजे ४७ रुग्ण गंभीर स्थितीत आहे. तर ॲक्टिव रुग्णांची संख्या ३४८ असून त्यापैकी जवळपास २३५ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. 

पुन्हा वाढले रुग्ण 
दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी वाढत आहे. मंगळवारी साडेसातशे चाचण्यांच्या अहवालांत ३५ नवे बाधित आढळून आले व एकूण रुग्णसंख्या ५७ हजार ३८९ झाली. तर केवळ १४ रुग्णच बरे झाले. दिवसभरात आणखी दोघा रुग्णांच्या मृत्यूनंतर बळींची संख्या १३६२ झाली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com