जळगावकरांनो..कोविशील्डसह कोव्हॅक्सिनही आल्यात !

जळगाव शहरातील ८ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण करण्यात येईल
 corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

जळगाव : जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून जवळपास संपुष्टात आलेल्या लशींच्या (Vaccine) साठ्याने लसीकरण थांबले (vaccination stop) होते. बुधवारी मात्र कोविशील्डसह (covishield) कोव्हॅक्सिनचे (covaxin) डोस प्राप्त (Vaccine Received) झाल्यामुळे गुरुवारपासून लसीकरण पुन्हा सुरळीत (vaccination start) होणार आहे. या साठ्यातून दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य असेल.

(jalgaon district vaccination start covishield covaxin vaccine received)

 corona vaccination
कोरोना संसर्गाची तीव्रता कमी..पण मृत्यूच्या आकड्यांनी चिंता वाढवली

जळगाव जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून लशींचा साठा संपला होता. नवीन डोसही गेल्या काही दिवसांत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्र जवळपास बंद होती. बुधवारी जिल्ह्यासाठी कोविशील्डचे साडेचार हजार व कोव्हॅक्सीनचे २ हजार ३००वर असे डोस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारपासून ठरावीक केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.

शहरात असे होईल लसीकरण

जळगाव शहरातील ८ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण करण्यात येईल. यात शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगरातील डी.बी. जैन, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, मास्टर कॉलनीतील मुलतानी हॉस्पिटल, कुंभारवाड्यातील शाहीर अमर शेख व सिंधी कॉलनीतील चेतनदास हॉस्पिटल येथे कोविशील्डची लस तर गणपती नगरातील स्वाध्याय भवन व कांताई नेत्रालय येथे कोव्हॅक्सीनची लस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येईल. तसेच या प्रत्येक केंद्रावर दुसऱ्या डोसला प्राधान्य तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार हेल्थवर्कर, फ्रंटलाइन वर्कर यांना दुसऱ्या डोसला प्राधान्य असेल.

((jalgaon district vaccination start covishield covaxin vaccine received)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com