esakal | सक्रिय रुग्णसंख्येत देशात जळगाव आठवे; स्थिती नियंत्रणाबाहेर 
sakal

बोलून बातमी शोधा

सक्रिय रुग्णसंख्येत देशात जळगाव आठवे; स्थिती नियंत्रणाबाहेर 

जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या नऊशेपार गेली. दिवसभरात ९८२ नवे रुग्ण समोर आले.

सक्रिय रुग्णसंख्येत देशात जळगाव आठवे; स्थिती नियंत्रणाबाहेर 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर गेलाय. देशभरातील सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा आठवा क्रमांक आहे. गुरुवार च्या आकडेवारीनुसार सक्रिय रुग्ण असलेल्या ‘टॉप टेन’ दहा जिल्ह्यांत राज्यातील आठ जिल्हे आहेत. 


जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १२) जिल्ह्यातील रुग्णसंख्या नऊशेपार गेली. दिवसभरात ९८२ नवे रुग्ण समोर आले. त्या मुळे एकूण रुग्णसंख्या ६८ हजार ६६२ झाली असून, सक्रिय रुग्ण सहा हजार ७१३ झाली आहे. शुक्रवारी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही ५१२ होती. त्या मुळे बरे झालेल्यांचा आकडा ६० हजार ५१७ वर पोचला आहे. सलग पाचव्या दिवशी पाचपेक्षा अधिक बळी गेलेत. गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील दोन व अन्य ठिकाणचे तीन असे पाच मृत्यू झाले. 


जळगावात विस्फोट 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जळगाव शहर सर्वाधिक प्रभावित झाले असून, शुक्रवारी शहरात तब्बल ३६३ रुग्ण आढळून आले. अन्य रुग्ण असे : जळगाव ग्रामीण- १९, भुसावळ- १९८, अमळनेर- १४, चोपडा- ७४, पाचोरा- ३०, भडगाव- एक, धरणगाव- आठ, यावल- ११, एरंडोल- चार, जामने- ४०, रावेर- १८, पारोळा- ४७, चाळीसगाव- १४२, मुक्ताईनगर- चार, बोदवड- सहा, अन्य जिल्ह्यातील तीन. 

देशातील ‘टॉप टेन’ जिल्हे 
(११ मार्चअखेरचे आकडे) 

जिल्हा ------- सक्रिय रुग्ण 
पुणे --------- १८ हजार ४७४ 
नागपूर ------- १२ हजार ७२४ 
ठाणे -------- दहा हजार ४६० 
मुंबई ------- नऊ हजार ९७३ 
बेंगळुरू ------ पाच हजार ५२६ 
एर्नाकुलम ---- पाच हजार ४३० 
अमरावती ----- पाच हजार २५९ 
जळगाव ----- पाच हजार २९ 
नाशिक ------ चार हजार ५२५ 
औरंगाबाद ---- चार हजार ३५४  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

loading image