esakal | ‘रेमडेसिव्हर’ची साठेबाजी रोखण्यासाठी कंट्रोल रूम 

बोलून बातमी शोधा

‘रेमडेसिव्हर’ची साठेबाजी रोखण्यासाठी कंट्रोल रूम 

कोरोनावरील औषधींच्या वापरावर व या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली. 

‘रेमडेसिव्हर’ची साठेबाजी रोखण्यासाठी कंट्रोल रूम 
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोविड संसर्गाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हर औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी औषध निरीक्षक अनिलकुमार माणिकराव यांच्या नियंत्रणाखाली अन्न व औषध प्रशासन कार्यालयात कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत. 

आवश्य वाचा- कोरोनोला कस हरवणार ! विकेंड लाॅकडाऊन संपताच बाजारात तोबा गर्दी 
 


या कक्षात चोवीस तास सातही दिवस अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील. सोमवार(ता. १२)पासूनच हा कक्ष सुरू झाला आहे. (दुरध्वनी क्र. ०२५७-२२१७४७६ व ईमेल covid19remd@gmail.com). कोविडच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

औषधीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ
खाजगी मेडीकल, खाजगी रुग्णालय यांच्यामार्फेत कोविडच्या उपचारासाठी आवश्यक Remdesivir, Tocilizumab, Itolizumab या औषधींच्या वापरावर व या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करुन सदर औषध उपलब्ध होत नसल्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने खाजगी मेडीकल, होलसेल डिलर्स यांच्यामार्फत Remdesivir, Tocilizumab, Itolizumab औषधीच्या खरेदी व वितरण यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे Remdesivir, औषधीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

आवर्जून वाचा- साहेब..आमचा बापाचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा 
 

 नागरीकांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 Remdesivir औषधे उपलब्ध होत नसल्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने कोविडच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हर उपलब्धतेबाबत नागरीकांना माहिती होण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 


संपादन- भूषण श्रीखंडे