esakal | जामनेरमध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर ‘गुलाबी गँग’  महिला पथकाची धडक मोहीम 

बोलून बातमी शोधा

जामनेरमध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर ‘गुलाबी गँग’  महिला पथकाची धडक मोहीम 

महिला बचत गटाच्या ‘गुलाबी गँग’ पथकाने शहरातील चौकाचौकात आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर धडक कारवाई केली.

जामनेरमध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर ‘गुलाबी गँग’  महिला पथकाची धडक मोहीम 
sakal_logo
By
सुरेश महाजन

जामनेर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण संख्या देखील प्रचंड वाढत आहेत. त्यात कोरोना सुरक्षेचे नियम कोणी पाळत नसल्याने यावर वचक ठेवण्यासाठी जामनेर नगरपालिकेने महिला बचत गटाला ‘गुलाबी गँग’ रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे.  

आवश्य वाचा- खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी
 

नगरपालिका प्रशासनाने नव्यानेच स्थापन केलेल्या महिला पथकामार्फत धडक मोहीम राबविली जात असून, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आर्थिक दंडाच्या रकमेसह गुन्हेही दाखल करण्यात येत आहे.

वाचा- पाच महिने उलटले तरी शेकडो केळी उत्पादक शेतकरी वंचित 
 

मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक

मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील महिला बचत गटाच्या ‘गुलाबी गँग’ पथकाने शहरातील चौकाचौकात आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर धडक देऊन एकूण नऊ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे असा ४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला, तर शहरामधील मयूर किराणा मालकांनाही कोरोना काळातील नियमांचा भंग केल्याप्रकरणी तब्बल पंधराशे रुपयांचा आर्थिक दंड केला. शिवाय, या प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात दोन गुन्हेही दाखल करण्यात आल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे