Jalgaon Crime News: कैऱ्या फुकटात न दिल्याने दांपत्याला मारहाण

Jalgaon Fight
Jalgaon Fightesakal

जळगाव : अर्धा किलो कैऱ्यांचे पैसे घेतल्याने त्याचे वाईट वाटल्याने पिंप्राळ्यातील एका तरुणाने महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंप परिसरात घडली.

Jalgaon Fight
Jalgaon Crime News: तरुणाकडून पैसे लाटणाऱ्या टोळीचा डाव फसला; तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव शहरातील संत मीराबाईनगरात शालू अशोक जाधव या पती अशोक किसन जाधव व कुटुंबियासह वास्तव्यास आहेत. शनिवारी (ता. २५) गुजराल पेट्रोलपंप परिसरात अशोक जाधव यांनी पिंप्राळा पसिरातील मढी चौकात राहणाऱ्या नितेश मिलिंद जाधव याच्याकडून घेतलेल्या अर्धा किलो कैऱ्याचे पैसे घेतले.

Jalgaon Fight
Jalgaon Crime News : दारुच्या नशेतच संपविले मित्राला...शिंगायत खूनप्रकरणी संशयितांकडून कबुली

या रागातून नितेश जाधव याने अशोक जाधव यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शालू जाधव या भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यांनाही नितेश जाधव याने शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच अशोक जाधव व त्यांच्या पत्नी शालू जाधव यांना ठार मारण्याची धमकी दिली.

Jalgaon Fight
Jalgaon News : बोगस पावत्यांच्या आधारे जळगाव जिल्ह्यात सर्रास वाळू वाहतूक; महसूल विभागाचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष

याप्रकरणी शालू जाधव यांच्या तक्रारीवरून नितेश मिलिंद जाधव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक राजेश चव्हाण तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com