आमदार गिरीश महाजनांसह १२५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार गिरीश महाजन

जळगाव : आमदार गिरीश महाजनांसह १२५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन, निदर्शनास बंदी आदेश लागू केले असताना सोमवारी (ता. २२) भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबेाल आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्रिपुरा राज्यात घडलेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर मालेगाव, नांदेड, अमरावती येथे बंदचे तीव्र पडसाद उमटून दंगली भडकल्या होत्या. या दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी सोमवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने, ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: औषधी हिरडा वृक्षाचे प्रमाण होतेय कमी..

आंदोलनासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाकारलेली असताना, तसेच जिल्ह्यात आंदोलने, निदर्शने बंदीचे आदेश लागू असताना, बंदी आदेश झुगारून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

महाजन, भोळे, चव्हाण संशयित

भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी विधान परिषद आमदार स्मिता पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, अशोक कांडेलकर, प्रकाश भगवानदास पंडित यांच्यासह १२५ पदाधिकारी, कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

loading image
go to top