भितीच संपली राव ! ठाण्यात पोलीसांसमोरचं ढिश्‍युम..ढिश्‍युम 

रईस शेख | Wednesday, 6 January 2021

मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी महिला व पुरूष शहर पोलीस ठाण्यात आले असता त्याचवेळी मारहाण पून्हा सुरू झाली.  

जळगाव -ः शहरातील गेंदालाल मिल परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना चौघांनी मारहाण केली होती. हा वाद शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पुन्हा चौघांकडून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलीसांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्वाची बातमी- नाव न घेता एकनाथ खडसे - गिरीश महाजनांची ‘तीरंदाजी’ तीव्र !
 

शहरातील गेंदालाल मिल मध्ये राहणारे नाजीमखॉ कादिरखॉ पटवे, रिजवाना बी शेख आमीर, आबेदाबी, फरिनबी जुबेर खान यांनी मागील भांडणाच्या कारणावरून एक महिला आणि पुरूष यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

Advertising
Advertising

अन सुरु झाली ढिशूम ढिशूम

मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी महिला व पुरूष शहर पोलीस ठाण्यात आले असता त्याचवेळी मारहाण करणारे चौघे देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि पुन्हा पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण करण्यास सुरूवात केली.

आवश्य वाचा- खड्यांचा 'बर्थडे' तो ही चक्क केक कापून; कुठे? वाचा सविस्तर 

 

पोलिसांची धाव..

पोलीस ठाण्यात सुरू असलेली मारहाण सोडविण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात हजर असलेले कर्मचारी उपनिरीक्षक अरूण सोनार, महिला सहाय्यक फौजदार संगिता खांडरे, संगिता इंगळे, मनिषा चव्हाण हे धावून गेले. भांडण सोडवत . पेालिस नाईक भुषण पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात नाजीमखॉ कादिरखॉ पटवे (वय-३०), फरिदाबी जुबेर खान (वय-३५) दोन्ही रा. गेंदालाल मिल, सिकंदर उस्मान खान (वय-३९), शोभा मुकेश पवार (वय-३५) दोन्ही रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र सोनार करीत आहे. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे