esakal | धक्कादायक! पिता-पुत्राचे सुरू होते भांडण; वडिलांनी चाकु हिसकावताच घडले भयंकर

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! पिता-पुत्राचे सुरू होते भांडण; वडिलांनी चाकु हिसकावताच घडले भयंकर}

बोलचाल होऊन दोघांमध्ये वाद झाला. मुलगा हातात चाकु काढून वडिलांना धमकावत होता. त्यामुळे वडिलांनी मुलाच्या हातातील चाकु हिसकवला आणि...

धक्कादायक! पिता-पुत्राचे सुरू होते भांडण; वडिलांनी चाकु हिसकावताच घडले भयंकर
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः मद्यदुंध मुलगा आपल्या वडिलांसोबत भांडत करत असतांना पित्याच्या हातून पुत्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात रात्री घडली. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

आवश्य वाचा- 'कटप्पा ने बाहूबली को क्यों मारा' असे पून्हा का म्हणाले जलसंपदा मंत्री  
 

मिळालेल्या माहितीनूसार जळगाव शहरातील बालाजीपेठ मधे सुभाष वर्मा हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. सुभाष बन्सीलाल वर्मा यांचा मुलगा सौरभ वर्मा (वय 26) याला दारूचे व्यसन जडले होते. दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशातच शुक्रवारी रात्री सौरभ दारू पिऊन घरी आला आणि दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील सुभाष वर्मा यांची सौरभ सोबत बोलचाल होऊन दोघांमध्ये वाद झाला. सौरभने हातात चाकु घेत वडिलांना धमकावत होता. त्यामुळे वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला.

आवर्जून वाचा- सर्वच पक्षांना धक्‍का..बावीस वर्षीय तरूणाने स्‍वतः पॅनल तयार करत ग्रामपंचायत घेतली ताब्‍यात 
 

आणि घडले भयंकर...

यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून संशयीत बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.