‘फास्टॅग’ विक्रीतून प्रवाशांची फसवणूक

ठराविक रकमेच्या बॅलन्सची ग्वाही; प्रत्यक्षात मिळतोय अर्धाच बॅलन्स
sale of Fastag cards fraud says people jalgaon
sale of Fastag cards fraud says people jalgaonsakal

जळगाव : महामार्गावरील तरसोद-चिखली टप्प्याचे चौपदरीकरण पूर्ण होऊन टोल सुरू झाल्यानंतर याठिकाणी विक्री होणाऱ्या ‘फास्टॅग’ कार्डच्या विक्रीतून प्रवाशांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .कार्ड विक्री करून ठराविक रकमेची ग्वाही दिली जाते, प्रत्यक्षात तेवढा बॅलन्स मिळत नसल्याने प्रवासी संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर तरसोद-चिखली टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सहा महिन्यांपासून नशिराबादजवळ या मार्गासाठी टोलवसुली सुरू असून, टोलनाक्याजवळ विविध बँकांचे फास्टॅग कार्ड विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. तेथील कर्मचारी प्रवासी वाहनधारकांना थांबवून कार्ड घेण्याबाबत आग्रह धरतात.

कार्ड नसेल, तर दुप्पट टोल

टोलनाक्यावर फास्टॅगद्वारे टोल वसूल झाल्यास सवलत मिळते. मात्र, कार्ड नसल्यास रोखीने पेमेंट केल्यास जवळपास दुप्पट टोल भरावा लागतो. उदाहरणदाखल... कारला टोलनाक्यावरून जाताना फास्टॅग असेल, तर एकावेळी ८५ रुपये द्यावे लागतात, ‘फास्टॅग’ नसेल तर कारसाठी तब्बल १७० रुपये टोल लागतो. त्यामुळे याठिकाणी नाक्याच्या दोन्ही बाजूंना फास्टॅग कार्ड विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो.

प्रवाशांची फसवणूक

असे असले, तरी ज्या बँकांचे कार्ड याठिकाणी विक्री होतात, तेथील कर्मचारी ठराविक बॅलन्सची ग्वाही देतात. प्रत्यक्षात ज्या वेळी टोलच्या स्वरुपात बॅलन्स कमी होतो, तेव्हा जी रक्कम सांगितली गेली, तेवढा बॅलन्स मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्राधिकरणाकडे तक्रार

बहुतांश प्रकारात जी वाहने जळगाव जिल्ह्याबाहेरची (एमएच १९ पासिंग नसलेली) आहेत, त्यांच्या बाबतीत हा प्रकार प्रकर्षाने घडत आहे. अन्य जिल्ह्यातील वाहन असल्याने ते परत येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अशा वाहनधारकांची फसवणूक होत आहे. याबाबत काही वाहनधारकांनी महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्यावर कारवाई झालेली नाही.

बँकांचा संबंध नाही

‘फास्टॅग’ कार्ड सुविधा देणाऱ्या बँकांकडे याबाबत विचारणा केली असता या स्टॉल अथवा कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले. हे एजंट असून, ते बँकांकडून केवळ कार्ड अथवा त्यासंबंधी बॅलन्सची सुविधा घेतात व ती थेट प्रवाशांना पुरवितात, असेही समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com