कापडसह किराणा दुकानावर डल्ला

लॅपटॉपसह जीन्स पॅन्ट लांबविल्या; काजू, अन्य साहित्यही लंपास
crime Theft clothes shop grocery store jalgaon
crime Theft clothes shop grocery store jalgaonsakal

जळगाव : शहरातील बळीराम पेठेत असलेल्या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप बनावट चावीने उघडून दुकानात चोरी केल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. तर दुसऱ्या घटनेत शिवाजीनगरातील किराणा दुकानात चोरट्यांनी काजू व अन्य साहित्यावर डल्ला मारल.

सिंधी कॉलनीतील समाधा कंपाऊंट सिद्धी कॉलनीतील रहिवासी वासुदेव दखीनमल बजाज (वय ५९) यांचे बळीराम पेठेत एसएसडी ग्रील नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करुन गेले. शुक्रवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे हे गस्तीवर असताना त्यांना बजाज यांच्या दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसलं.

बनावट चावीने उघडले कुलूप

बजाज हे दुकानावर येऊन त्यांनी पाहणी केली असता, त्यांना दुकानाच्या शटरला लावलेले दोघ पितळी कुलूप बनावट चावीच्या साहाय्याने उघडून ते बाजूला फेकलेले दिसून आले. दुकानात जाऊन पाहणी केली असता, त्यांना दुकानात ठेवलेला १५ हजारांचा लॅपटॉप, ४ हजार रुपयांची रोकड व २५ हजार रुपये किमतीच्या ५० नग जीन्स पॅन्ट असा एकूण ३९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याचे दिसून आले. याप्रकरणी शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विजय निकुंभ हे करीत आहे.

किराणा दुकान फोडून १४ हजारांचा माल लंपास

दुसऱ्या घटनेत शहरातील शिवाजीनगरातील संभाजी चौकातील रहिवासी कैलास टेकचंद कथुरीया (वय ७७) यांची तीन मजली इमारत असून त्यांचे खालच्या मजल्यावर के. टी. कथुरीया किरणा सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे. त्यांच्याकडे केशव दत्तात्रेय पोळ (वय ३८) हे दोन महिन्यांपासून कामाला आहे.

गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कैलास कथुरीया यांनी दुकान बंद करून ते घरी निघून गेले. शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारे संजय पांडे यांनी त्यांना फोन करून शटरला लावलेले कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली.कैलास कथुरीया यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली.

यावेळी त्यांना शटरला लावलेल्या तीन कुलूपांपैकी दोन कुलूप तुटलेले त्यांना दिसले. दरम्यान, त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली.

रोकडसह काजू लंपास

दुकानात जाऊन कथुरीया यांनी पाहणी केली असता, त्यांना दुकानात असलेली ७ हजार रुपये किंमतीची १० किलोची काजूची बरणी, ८४० रुपयांची ५ लीटरची तेलाची कॅन, ५ हजार रुपयांची टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली छोटी तिजोरीतील चिल्लर, २ हजार रुपयांचे आइस्क्रीमच्या महागडी कॅटबरी व १० रुपयांची पाण्याची बॉटल असा एकूण १४ हजार ८५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता.याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com