Jalgaon Crime News : ...तर तुझ्या भावाला चौकात गोळ्या घालू; घरात शिरून धमकी

Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : विदगाव (ता. विदगाव) येथील दोघांनी सधन शेतकऱ्याच्या घरात घुसून दोन लाखांची खंडणी मागून धमकावले. ‘तुझ्या भावाचे धंदे आम्हाला माहिती आहेत. (criminal threatened farmer and demand an extortion of 2 lakhs jalgaon crime)

तू दोन लाख दे, नाही तर तुझ्या भावाला भरचौकात गोळ्या घालतो. आताच दरोड्याच्या गुन्ह्यातून सुटून आलोय’, अशी धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

विदगाव येथील शेतकरी भगवान भावलाल कोळी (वय ४३) रविवारी (ता. ९) दुपारी घरी एकटे असताना, गावातील अनिल ऊर्फ बंडू भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे त्यांच्या घरात बळजबरी घुसले. भगवान कोळी यांना म्हणाले, की तुझा भाऊ जनार्दन कोळी बिल्डर आहे.

शिवाय तुही आता कापूस आणि गहू विकला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त झाले आहेत. तुझा भाऊ जनार्दन कोळी अंगात सोने घालून फिरतो. आम्ही त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार मारू शकतो. तुला तुझा भाऊ प्रिय असेल, तर दोन दिवसांत आम्हाला दोन लाख रुपये दे, नाही तर विदगावच्या भरचौकात जनार्दन कोळीला गोळ्या घालू.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Crime
Jalgaon Crime News : लग्न समारंभातुन साडेतीन लाखांचे दागिने लंपास

आम्ही आताच दरोड्याच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहोत. आमचे कुणाही काहीही करू शकत नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

हा प्रकार घडल्यानंतर भगवान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात संशयित अनिल ऊर्फ बंडू कोळी आणि सचिन सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्या दोघांना पोलिसांनी सोमवारी (ता. १०) दुपारी अटक केली व जिल्‍हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस नाईक वासुदेव मराठे तपास करीत आहेत.

Crime
Jalgaon Crime News : मध्यवर्ती बसस्थानकात पर्समधून दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com