जळगाव जिल्ह्यातील शाळा 'या' तारखेपासून सुरु होणार

शाळापूर्व तयारी पहिला शाळास्तर मेळावा १८ एप्रिलला आयोजित करण्यात आला होता.
school open
school openesakal

जळगाव : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १३ जून २०२२ पासून सुरू होणार आहेत. पाल्य शिकला पाहिजे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते, त्यामुळे पालकांनी अधिकाधिक संख्येने आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने केले.

शाळापूर्व तयारी पहिला शाळास्तर मेळावा १८ एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये १८२१ शाळेतील २९हजार ३४७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले होते. शाळापूर्व तयारी दुसरा मेळावा १५ जूनला आयोजित करण्यात येणार आहे.

school open
विक्रेत्यांचे साहित्य जाते कुठे? अतिक्रमण विभाग चक्रावला

जि.प. शाळांतही गुणवत्ता

शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये १३ जून २०२२ पासून शाळा सुरु होणार आहेत. आपलं मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली जात आहे.

उपक्रम ठरले वैशिष्ट्यपूर्ण

सन २०२१-२२ मध्ये शाळाबाहेरची शाळा, शाळा बंद पण शिक्षण सुरु, व्ही- स्कूल अॅप, गल्ली मित्र, एक गाव एक बालरक्षक, मिशन शिक्षण हमीपत्रक, पालक संपर्क अभियान असे विविध उपक्रम शिक्षण विभागाने राबवून विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते टिकवून ठेवलेले आहे व यापुढे हे नाते अधिक घट्ट करावयाचे आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रातही अशाच प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्याच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही डॉ. आशिया यांनी दिली.

school open
"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास | मार्जरासन | Hand-leg coordination in Marjarasan | योग प्राणायाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com