Jalgaon Crime News : मांगलवाडी येथील युवकाचा नग्नावस्थेत आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead Vinod Kandele

Jalgaon Crime News : मांगलवाडी येथील युवकाचा नग्नावस्थेत आढळला मृतदेह

तांदलवाडी (जि. जळगाव) : येथून जवळच मांगलवाडी (ता. रावेर) येथे रविवारी (ता.२६) सकाळी सहाच्या सुमारास एका तरुणाचा नग्नवस्थेत मृतदेह (Dead) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (dead body of youth in Mangalwadi was found naked jalgaon crime news)

विनोद सुभान कांडेले वय (३५) असे मृत तरुणाचे नाव असून, गावाजवळ असलेल्या खोरीच्या बाजूला काट्यांमध्ये हा मृतदेह आढळून आला.

याबाबत मांगलवाडी येथील रहिवाशी अमोल सूर्यभान ठाकरे (वय २१) यांनी खबर दिल्याने निंभोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून पंचनामा करून तपास सुरू आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

रावेर ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण, गणेश सूर्यवंशी हे करीत आहे.

टॅग्स :JalgaoncrimedeathYouth