Jalgaon News : प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

pregnant Women
pregnant Womensakal

Jalgaon News : तालुक्यातील लोण तांडा येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Death of a woman during childbirth jalgaon news)

लोणतांडा येथील गायत्री हिचा विवाह एरंडोल तालुक्यातील खडके येथील दिनेश पवार यांच्याशी गेल्या वर्षीच झाला होता. प्रसूती जवळ आल्याने गायत्री ही माहेरी लोण तांडा येथे आली होती.

दरम्यान, २५ मेस अचानक प्रसूती कळा जाणवू लागल्याने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिने मुलास जन्म दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

pregnant Women
Jal Jeevan Mission : अंबारे-करणखेडा गावाचा पाणीप्रश्न सुटणार; पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

मात्र अतिरक्तस्त्राव होत असल्याने तिला धुळे येथे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले.

याप्रकरणी पती दिनेश पवार यांच्या फिर्यादीवरून धुळे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन मारवड पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी रेखा इशी तपास करीत आहेत.

pregnant Women
Jalgaon News : सेतू चालकांकडून विद्यार्थी, पालकांची लूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com