Jalgaon News : आव्हाणे शिवारात आढळला कुजलेला मृतदेह | decomposed dead body was found in Avhane Shivar jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : आव्हाणे शिवारात आढळला कुजलेला मृतदेह

Jalgaon News : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील शेतात कुजलेल्या स्थितीत हाडांचा सांगाडा असलेला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. जळगाव शहरातील विद्यानगरमधील मनोज हरिश्चंद्र पाटील यांचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात गट क्रमांक ६८८ याठिकाणी शेत आहे. (decomposed dead body was found in Avhane Shivar jalgaon news)

मनोज पाटील मंगळवारी (ता. ९) दुपारी चारला त्यांच्या शेतात गेले होते. यादरम्यान शेतातील बोरींगजवळ मनोज पाटील यांना अनोळखी व्यक्तीचा हांडांचा सांगाडा आढळून आला. त्यांनी याबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत श्री. पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. पोलिस उपनिरिक्षक सायकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaondead body found