
Maha Vikas Aghadi : मविआच्या आंदोलनामुळे आशा पल्लवित; महामार्ग दुरुस्ताचा प्रश्न ऐरणीवर
कजगाव (जि. जळगाव) : येथील बस्थानक परिसरात आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारावेत, या मागणीने आता जोर धरला असून, महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi)
आंदोलनानंतर कजगावकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (demand to erect traffic jam at necessary places in Bus stand area has now gained momentum after movement of Maha Vikas Aghadi protest jalgoan news)
महाविकास आघाडीतर्फे नुकताच जळगाव-चांदवड महामार्गावरील दुरुस्तीसंदर्भात कजगावसह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी कजगाव येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनामध्ये कजगाव बस्थानक परिसरातील गतिरोधक व दुभाजक हटविण्याची मागणी प्रामुख्याने लावून धरण्याचे आली होती.
चाळीसगाव रस्त्याकडून भडगाव रस्त्याकडे जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा फेरा मारून जावे यावे लागते. त्यामुळे पोलिस मदत केंद्राच्या परिसरात व बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील परिसरात आवश्यक ठिकाणी रस्ता कट करून रहदारीचा मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी जोरदार होत आहे. कजगाव बसस्थानक परिसरात व आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक नाहीत.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याच रस्त्यावरून प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक दवाखाने, विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, मुलांची शाळा, उर्दू शाळा, लहान बालकांच्या इंग्लिश स्कूल, तलाठी कार्यालय, पोलिस मदत केंद्र, विकासो, सराफ बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ असे अनेक गर्दीच्या ठिकाणी जाणारे रस्ते
असल्याने येथे गतिरोधक व जाण्यासाठी दुभाजकाजवळील काही भाग कट करून रस्ता मोकळा करणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभाग ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून रोष ओढवून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलन झाले आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
"गेल्या काही दिवसांपूर्वीच बस्थानक परिसरात गतिरोधक बसविण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. मात्र अजूनही ठोस निर्णय होत नाही. दररोज अपघात होतात. त्यामुळे लवकरच गतिरोधक उभारणे गरजेचे झाले आहे. तसेच ग्रामपंचायत पातळीवर योग्य ते नियोजन झाल्यास तेही केले जाईल." - रघुनाथ महाजन लोकनियुक्त सरपंच, कजगाव
"कजगाव बसस्थानक व परिसरात गतिरोधक असणे खूप गरजेचे झाले आहे. वृद्ध व बालकांना तसेच ग्रामस्थांना रस्ता जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतो तसेच रहदारी मोकळी करण्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी." - दिनकर पाटील ज्येष्ठ नागरिक तथा काँग्रेस पदाधिकारी
"अनेक वेळा मागणी करूनही संबंधित विभाग येथे गतिरोधक बसविण्याची कार्यवाही करीत नाही त्यामुळे ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे. अनेक वेळा येथे अपघात होत असतात. त्यामुळे येथे तत्काळ गतिरोधक बसविण्यात यावे." - अनिल टेलर, माजी ग्रामपंचायत सदस्य
"कजगाव बसस्थानकासमोर गतिरोधक नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी व विविध ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना गतिरोधक नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे." - अशोक पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कजगाव