Jalgaon Crime News : हद्दपार संशयित तलवारीसह अटकेत

Jalgaon Crime News : हद्दपार संशयित तलवारीसह अटकेत
esakal

Jalgaon News : कानळदा (ता. जळगाव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. (Deportation suspect arrested with sword jalgaon Crime news)

पोलिस कर्मचारी प्रशांत ठाकूर याने दिलेल्या तक्रारीनुसार अटकेतील संशयित आकाश इच्छाराम सपकाळे (रा.कानळदा) याला दोन वर्षांकरिता जिल्‍ह्‍यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.

असे असताना हद्दपारीचे आदेश झुगारून आकाश सपकाळे हा कानळदा गावात बुधवारी (ता.२४) संध्याकाळी हातात तलवार घेत दहशत माजवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime News : हद्दपार संशयित तलवारीसह अटकेत
Jalgaon Accident News : चालत्या रेल्वेतून उतरताना चाळीसगावला शिक्षकाचा मृत्यू

तालुका पोलिसांनी त्यास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २ फूट लांबीची धारदार तलवार मिळून आली. त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार रामकृष्ण इंगळे तपास करत आहेत.

Jalgaon Crime News : हद्दपार संशयित तलवारीसह अटकेत
Nashik Crime: मालेगावला वर्मा ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा; तिघा महिलांनी लंपास केले सव्वासात लाखाचे दागिने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com