Jalgaon : भाजपविरुद्ध शिंदे गटाची मंगळवारी अपात्रतेची सुनावणी

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : राज्यातील राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. दोन दिवसात मित्र आणि राजकीय शत्रूही बदलले आहेत. तिच स्थिती जळगाव महापालिकेच्या (jalgaon municipal Corporation) राजकारणातही झाली आहे. भाजपमधून फुटून काही नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता, त्या बंडखोरांना अपात्र करण्यासाठी भाजपने (BJP) याचिका दाखल केली आहे, परंतु आता त्याच नगरसेवकांचे नेते राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अपात्रतेच्या याचिकेवर आता मंगळवारी (ता. ५) सुनावणी होणार त्यामुळे भाजप आणि बंडखोर नगरसेवक यावर काय भूमिका घेणार याकडेच आता लक्ष आहे. (Disqualification hearing of Shinde group against BJP on Tuesday jalgaon political news)

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र त्यातील ५७ नगरसेवक फुटले होते. त्यांनी स्वतंत्र गट करून शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या बळावर शिवसेनेचे महापौर झाले तर बंडखोर गटाला उपमहापौरपद देण्यात आले.

भाजपची अपात्रतेची याचिका

बंडखोरी केलेल्या २७ नगरसेवकांविरूध्द भारतीय जनता पक्षाने नाशिक विभागीय आयुक्ताकडे अपात्रतेची याचिका दाखल केली होती. गटनेते भगत बालाणी यांनी ही याचिका दाखल केली आहे. भारतीय जनता पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या २७ बंडखोर गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांविरूध्दच याचिका दाखल केली आहे. आम्ही महापालिकेत भाजप पक्ष असून आमचा ‘व्हीप’ बंधनकारक आहे, तो मोडल्याबद्दल भाजपच्याच नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका बंडखोर भाजप गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे यांनी दाखल केली आहे. त्यांनी प्रभाग समिती सभापती निवडीच्या वेळेस भाजपच्या नगरसेवकांना ‘व्हीप’जारी केला होता. तो मोडल्याचा भाजप नगरसेवकांवर आरोप आहे. औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका विभागीय आयुक्ताकडे प्रथम सुनावणीसाठी पाठविली.

दोन्ही याचिकावर मंगळवारी सुनावणी

भारतीय जनता पक्षाने बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत केलेली याचिका आणि बंडखोर नगरसेवकांनी भाजप नगरसेवकांवर अपात्र करण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (ता. ५) रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यातील सत्तेत दोन्ही मित्र

भाजप आणि बंडखोर नगरसेवक महापालिकेत शत्रू आहेत, परंतु आता राज्यातील सत्तेत दोन्ही मित्र झालेले आहेत. बंडखोरांचे याचिकाकर्ता दिलीप पोकळे व त्यांच्या समवेत असलेले पाच नगरसेवक यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांनी थेट ठाण्यात जाऊन त्यांना पाठिंबा दिला आहेत. तेच एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे या नगरसेवकांनी शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले आहे, त्यामुळे आमच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत शिंदे यांनी लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आता दोन याचिकाकर्ते राज्यातील सत्तेत मित्र असल्याने ही याचिका मागे घेतली जाणार काय? याकडेच आता दोन्ही पक्षाचे लक्ष लागले आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon : ‘त्या’ सिरीयल किलरविरुद्ध खुनाचे 2 गुन्हे दाखल

"आमचे नेते गिरीश महाजन व सुरेश भोळे आता मुंबई येथे आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आता चर्चा करणार आहोत. ते जो निर्णय देतील त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत."

- भगत बालाणी, याचिकाकर्ता, गटनेता भाजप

"महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तासमिकरण बदलले होते. आता राज्यातीलही सत्ता समीकरण बदलले आहे, आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे राज्यात आम्ही मित्र आहोत. त्यामुळे या याचिकेबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहिल."- ॲड. दिलीप पोकळे, याचिकाकर्ता, गटनेता बंडखोर गट

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon : बनावट कागदपत्राद्वारे स्टेट बँकेला चुना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com