Jalgaon News : चाळीस कोटींच्या प्रशासकीय मान्यतेचे पालकमंत्र्यांच्या वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fund

Jalgaon News : चाळीस कोटींच्या प्रशासकीय मान्यतेचे पालकमंत्र्यांच्या वितरण

जळगाव : समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या ४० कोटी रुपयांच्या ९०१ कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवकांना वितरित करण्यात आले. (Distribution of Administrative Approval of Forty Crores by Guardian Minister jalgaon news)

येथील नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते नागपूरच्या महात्मा ज्योतिबा फुले शासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे झालेल्या निंबध स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम आलेल्या माधुरी सुनील पाटील यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

संविधान दिनानिमित्त नागरपूरच्या महाज्योतीतर्फे झालेल्या राज्य निबंध स्पर्धेत त्यांनी राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना त्यांचे बँक खात्यात रोख ३० हजार व सन्मानचिन्ह महाज्योतीकडून देण्यात आले. त्याचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

दहावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उतीर्ण झालेले व पुढील वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे, यासाठी जळगाव जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७९४ विद्यार्थ्यांना टॅब (टॅबलेट संच) प्राप्त झाले आहेत. आंकाक्षा पाटील, पराग पाटील, वेदांत पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, अतिरिक्त सीईओ बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonFunding