Jalgao News : अखेर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबित; राज्य शासनाचे आदेश

ramsingh sulane
ramsingh sulaneesakal

Jalgaon News : अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २१ मार्चला अधिवेशनात केली होती.

मात्र त्याबाबतचे आदेश निघालेले नव्हते. सोमवारी (ता. १०) राज्य शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी प्रांताधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश काढलेत. निलंबन काळात सुलाणे यांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी द्यावी लागणार आहे. (District Magistrate Ram Singh Sulane suspended Orders of State Govt Jalgaon News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ramsingh sulane
Nashik News : ZPच्या 15 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; वेतन कपातींच्या निर्णयांचा संभ्रमाचा परिणाम

आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी आक्षेप घेत तक्रारी नोंदवल्या होत्या. शिवाय बोदवड येथील गौण खनिज प्रकरणाबाबत लक्ष वेधण्यात आले होते.

मूळात शेती प्रयोजनासाठी जागा असताना तेथे गौण खनिजाची उत्खननाला परवानगी देण्यात आली, तसेच त्यानंतर तेथेतच दंडात्मक कारवाई करण्यात आली व नंतर पुन्हा उत्खनन केल्यानंतर दंडाला स्टे देण्यात आल्याचा प्रकार प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात अधिकार नसताना बेकायदा केला होता.

सावकारेंचीही तक्रार

भुसावळातील आमदार संजय सावकारे यांनी देखील वेल्हाळे येथील आदिवासी जमिनीचे हस्तांतरणाचे अधिकार नसताना प्रांताधकाऱ्यांनी अधिकाराचे उल्लंघन केल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.

ramsingh sulane
Nashik Committee Election : महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com