Agriculture News : बिलाशिवाय बियाणे खरेदी करू नयेत; कृषी विभागाची माहिती

Dont buy seeds without bill Agriculture Department alert farmer jalgaon news
Dont buy seeds without bill Agriculture Department alert farmer jalgaon newsesakal

Jalgaon News : राज्यात अंकुर सीड्‌स कंपनीचे स्वदेशी ५ हे वाण कोठेही उपलब्ध होणार नसल्याचे कंपनीने कळविले आहे. यामुळे हे वाण बोगस पद्धतीने विक्री होऊ शकते. (Dont buy seeds without bill Agriculture Department alert farmer jalgaon news)

शेतकऱ्यांनी अशाप्रकारचे बियाणे विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. यंदा बियाणे, खतांचा भरपूर स्टाक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांनी बियाणे घेताना त्याचे बिल घ्यावे, त्याशिवाय बियाणे, खते खरेदी करू नये. बिल नसल्यास संबंधितांवर नंतर कारवाई करता येत नाही. स्वदेशी ५ हे वाण कोणी विकताना आढळल्यास त्याच्यावर बियाणे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील.

बोगस बियाणे विक्री करण्यावर नजर ठेवण्यासाठी १६ भरारी पथकांची स्थापना केली आहे. अनधिकृतपणे बियाणे विक्री करताना कोणी आढळल्यास पंचायत समितीचा कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dont buy seeds without bill Agriculture Department alert farmer jalgaon news
Nandurbar Agriculture News : 24 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी; बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला

कापसाची २७ लाख पाकिटे

जिल्ह्यात कपाशीचा पेरा अधिक होतो. यंदा २७ लाख ५० पाकिटे बीटीची मागविली आहेत. कपाशीचे पाकिटे डिलरपर्यंत पोचली असली, तरी बियाणे विक्री १ जूनला सुरू होणार आहे. मका, सोयाबीन बियाण्यांची मागणी केली आहे. एकूण ४४ हजार ४३२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात खतांचा एक लाख ६६ हजार टन साठा उपलब्ध आहे. पोटॅश, यूरियाचाही साठा आहे. व्हॉइट पोटॅश ही खते लवकरच उपलब्ध होतील.

कपाशीचा पेरा घटणार

यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. सोबतच मागील वर्षाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे यंदा २५ ते ३० हजार हेक्टर कापसाचा पेरा घटणार आहे. शेतकऱ्यांनी १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात व संमिश्र पिके घ्यावीत, असे कृषी विभागाने कळविले आहे.

Dont buy seeds without bill Agriculture Department alert farmer jalgaon news
Dhule Agriculture News : जिल्ह्यात सव्वादहा लाख बीटी बियाणे पाकिटांची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com