Jalgaon News : ट्रॅक्टरखाली बकऱ्या आल्याने चालकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon News : ट्रॅक्टरखाली बकऱ्या आल्याने चालकाला मारहाण

जळगाव : सावदा येथील शासकीय विश्रामगृहाजवळ बुधवारी (ता. २२) सायंकाळी ट्रॅक्टरचालकाने बकऱ्यांना धडक देऊन जखमी (Injured) केले. (driver beaten up due to Goats came under tractor jalgaon news)

ट्रॅक्टर थांबवून ग्रामस्थांनी चालकाला बदडून काढले. थोड्या वेळाने ट्रॅक्टर चालकासोबत असलेल्या जमावाने हल्ला केल्याने दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. जखमींवर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सावदा येथील रहिवासी गुलाम शेख मंजूर (वय ४५) यांच्या बकऱ्या रस्त्यावरून जात असताना, विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरचालकाने बकऱ्यांना धडक दिली. त्यात बकऱ्या जखमी झाल्या. त्यामुळे नागरिकांनी चालकाला थांबवून वाद घातला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ

वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. चालकाला जमावाने मारहाण करून पिटाळून लावले. थोड्याच वेळाने चालकासोबत आलेल्या जमावाने हल्ला चढवून गुलाम शेख मंजूर व त्याचा भाऊ साबीर शेख मंजूर (वय ४३) यांना जखमी केले. जखमींना सुरवातील ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, जखमीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :JalgaonBeatingtractor