जळगाव : अंडापाव विक्रेत्याला रॉडने बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beaten

जळगाव : अंडापाव विक्रेत्याला रॉडने बेदम मारहाण

वरणगाव (जि. जळगाव) : शहरातील वाईन शॉपसमोरील अंडापाव विक्रेत्याच्या गाडीवरील खुर्ची एका ग्राहकाने तोडली. याचा जाब विचारल्यावरून चार ते पाच जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोन जण जखमी झाले असून, एकाला गंभीर दुखापत झाली आहे. (Egg seller beaten by rod in Jalgaon district)

शहरातील विकास वाईन शॉपीसमोर अजय कोळी अंडा-पाव विक्रीची गाडी नियमित लावतो. सोमवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास युवराज मेढे अंडा- पाव खाण्यासाठी आला असता, त्याने विक्रेत्याची फायबरची खुर्ची तोडली. यामुळे विक्रेत्याने त्याला जाब विचारल्याने मेढे याला राग आल्याने दोघांमध्ये वाद झाला. युवराज मेढे व त्याच्या चार- पाच मित्रांनी अजय तुकाराम कोळी व त्याचे मामा सुनील चिंतामण साळुंके यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यात दोघांना दुखापत झाली असून, सुनील साळुंके यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अजय कोळी याच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: मद्याच्या नशेत गेला झोल; गोलाणीत छतावरून पडून तरुण ठार

हेही वाचा: 3 स्टार हॉटेलात 2 महिने जेवणासह रिचवली दारू; पैसे मागताच पसार

Web Title: Egg Seller Beaten By Rod In Jalgaon District Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News
go to top