
जळगाव : उष्माघाताने वृद्ध महिलेचा मृत्यू
यावल : अट्रावल (ता.यावल) येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ११) सकाळी उघडकीस आली. ही महिला मंगळवारी (ता. १०) शेतात गेली होती व ती परत आलीच नाही. शोध घेतल्यानंतर बुधवारी तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत येथील पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अट्रावल (ता.यावल) येथील लीलाबाई रामकृष्ण चौधरी (वय ८०) व त्यांचे पती रामकृष्ण चौधरी हे दोन वृद्ध राहतात. मंगळवारी सकाळी लीलाबाई चौधरी या शेतात जाऊन येते, असे सांगून घरातून गेल्या होत्या. त्या सायंकाळी घरी परत आल्या नाहीत. तेव्हा बुधवारी सकाळपासून त्यांचा शोध अट्रावलचे पोलिस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रवींद्र चौधरी, अभय पाटील, अभय महाजन यांच्यासह ग्रामस्थांनी घेतला लीलाबाई यांचा मृतदेह सकाळी दहाला अट्रावल शिवारातील नामदेव धनजी चौधरी यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत आढळून आला. त्या वयोवृद्ध होत्या. उन्हाची तीव्रता मंगळवारी अधिक असल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मृत लीलाबाई यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. परेश रमेश चौधरी यांच्या माहितीवरून येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अशोक जवरे तपास करीत आहेत.
हेही वाचा: आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण
हेही वाचा: 5 बहिणींच्या एकुलत्या एक भावावर काळाचा घाला; कुटुंबाला आक्रोश अनावर
Web Title: Elderly Woman Dies Of Heatstroke Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..