Employee Strike : अमळनेर येथे ‘GR’ची होळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

strike

Employee Strike : अमळनेर येथे ‘GR’ची होळी

अमळनेर (जि. जळगाव) : संपाच्या तिसऱ्या दिवशी नगरपालिकेच्या ५०० कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून तहसील कचेरीजवळ सर्व संघटना मिळून आंदोलनकर्त्यांनी जुनी पेन्शन विरोधात जीआरची होळी केली. (employee strike burnt old pension scheme GR Amalner jalgaon news)

जुनी पेन्शन योजनेसाठी संपाची तीव्रता वाढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी संघटनांनी पालिकेपासून सुभाष चौक, तिरंगा चौक, महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा आला. त्याठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील होऊन मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सभेत टीडीएफ संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, खासगी प्राथमिक शिक्षक संघटना, ओबीसी शिक्षक संघटना,शिक्षकेतर कर्मचारी संघटना, आरोग्य संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना,

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

कृषी सहाययक संघटना अशा विविध संघटनांच्या पदाधिकारिनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संघटनांतर्फे जुनी पेन्शन बंद करण्याचा जीआर, एनपीएस जीआर, मेस्मा कायदा निर्णय आदी शासकीय जीआरची होळी करून निषेध नोंदवला.

मोर्चात अनिल बेडवाल, पप्पू कलोसे, राजू चंडाले, अविनाश संदानशीव, सोमचंद संदानशीव, राधा नेतले, अरुणा बहारे यांच्यासह सफाई कर्मचारी हजर होते.