Cotton Rate Update : एरंडोलचा सेंद्रीय कापूस निघाला परदेशात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Rate

Cotton Rate Update : एरंडोलचा सेंद्रीय कापूस निघाला परदेशात

एरंडोल : राज्य शासन पुरस्कृत कापूस पिकाची उत्पादन वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत सेंद्रीय कापूस प्रकल्पातील उत्पादित झालेल्या कापसाला परदेशातून मोठी मागणी आहे. तालुक्यातून उत्पादीत झालेल्या सेंद्रीय कापसाला दहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.सेंद्रीय कापसाला मिळालेल्या या उच्चांकी भावामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य शासन पुरस्कृत कापूस पिकाची उत्पादन वाढ व मूल्य साखळी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय कापूस प्रकल्पात तालुक्यातील चार गावांमधील सुमारे शंभर शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. प्रकल्पासाठी तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. (Erandol organic cotton goes abroad farmers get price of ten thousand of highprice Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : शासकीय कार्यालयांचा मालमत्ता कर थकीत!

बैठकीत मंडळ कृषी अधिकारी प्राजक्ता पाटील, कृषी पर्यवेक्षक किशोर साळुंखे, आय. बी. पवार यांनी शेतकऱ्यांना योजनेबाबत माहिती दिली. कृषी सहाय्यक कुंदन पाटील, विजेंद्र महाजन, चंद्रकांत जगताप, श्री. बेळगे यांनी चार गावातील शेतकऱ्यांची निवड केली.

या प्रकल्पांतर्गत तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांच्या प्रयत्नांनी धुळे येथील जयभूमी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने नियंत्रण संस्था म्हणून असलेल्या संबंधित कंपनीने शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय कापूस खरेदी करण्याची हमी घेतली व संबंधित शेतकऱ्यांशी तसा करार देखील केला.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News : औरंगाबाद रोडवरील ‘तो’ सिग्नल पुन्हा बंद! बेशिस्त वाहतुकीतून पुन्हा अपघाताचा धोका

शेतकऱ्यांना देशी वाणाचे बियाणे देखील पुरवले. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली देशी नॉन बीटी कापसाची लागवड केली. यामध्ये उत्पादन खर्च कमी करणे, हा उद्देश ठेवण्यात आला होता. सर्वप्रथम बियाणावर बीजप्रक्रिया करूनच लागवड करण्यात आली.

देशी कापसामध्ये सापळा पीक म्हणून चवळी, अंबाडी, झेंडू व कडेला मक्याची दाट लागवड करण्यात आली. कापूस पिकाला शेतकऱ्यांनी स्वत: तयार केलेले निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, अंडजनित अमिनो आम्ल याची फवारणी करून किडींचा बंदोबस्त केला.

ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत केली. पिकाला गांडूळ खात कल्चरने तयार केलेले शेणखत, जीवामृत देण्यात आले. तसेच कृषी विभागाने दिलेल्या विविध सेंद्रिय निविष्ठा देखील देण्यात आल्या. शेतीशाळेच्या माध्यमातून कृषी विभागातर्फे कृषी संचालक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. जाधवर यांनी वेळोवेळी शेतांवर भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा: Nashik News : MPSCच्या घोळामुळे पत्रकारिता पदवीधरांचा जीव टांगणीला

निर्यातीसाठी प्रोत्साहन

जयभूमी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने करार केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांकडून ९ हजार ५०० दराने व पाचशे रुपये बोनस असा दहा हजार रुपये दराने कापूस खरेदी केला. हा कापूस आंतरराष्ट्रीय कंपनीमार्फत कसराबाद येथे जीनिंग व प्रोसेसिंग करून निर्यात करण्यात आला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय खताची लागवड करून दहा हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून कृषी विभागाचे आभार मानले.

हेही वाचा: Nashik News : अवैधरीत्या सोनोग्राफी प्रकरणी उद्या सुनावणी