Cotton Crop News : कापसाला सात ते साडेसात हजार दर मिळण्याचा अंदाज; खरिपाच्या उत्पन्नात 30 टक्के घट

Cotton News
Cotton Newsesakal

Cotton Crop News : जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के पाऊस झाला. यामुळे आगामी रब्बी हंगामात चांगले उत्पादन येण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. पावसाळ्यातील पावसाच्या ओढीने खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के तुट येणार आहे. बागायती कापसासह जिरायतीला सात ते साडेसात हजारांचा दर मिळू शकेल, अशी शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या खरिप हंगामात (२०२२) कापूस उत्पादन चांगले आले. त्यावेळी कापसाला २०२१प्रमाणे दहा ते तेरा हजारांचा दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापसाची मागणी, दर पाहता कापसाला साडेसात ते आठ हजारांचा दर मिळाला. (Estimated price of cotton is 7000 to 7500 in jalgaon news)

यामुळे शेतकऱ्यांनी गरजेप्रमाणे, भाव वाढलेले असतानाच कापूस विक्रीला आणला. आताही गत खरिप हंगामातील दीड ते दोन लाख गाठी तयार होतील एवढा कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.

या हंगामातील खरिपातील कापूस उत्पादनाचा विचार करता, बागायती कापूस चाळीस टक्के क्षेत्रावर आहे. त्याचा दर्जा चांगला आहे. कोरडवाहू कापूस साठ टक्के क्षेत्रावर आहे. त्याची अद्यापही पावसाअभावी वाढ पूर्ण झालेली नाही. त्याचे उत्पादन नवरात्रोत्सवात येणे अपेक्षीत होते. मात्र ते डिसेंबरमध्ये येईल.

दसरा- दिवाळीत बागायती कापूस बाजारात विक्रीस येईल. त्याला सध्या असलेला सात ते साडेसात हजारांचा दरच मिळेल. कारण अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाला मागणी वाढलेली नाही.

Cotton News
Jalgaon Cotton News : कापसाच्या पेऱ्यात होणार 10 टक्के घट

जर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला मागणी वाढून खंडीचा दर साठ हजारांपर्यंत गेला, तरच कापसाचे दर वाढतील, असे चित्र आहे.

दोन लाख गाठी कमी

२०२२ च्या खरिप हंगामात वीस लाख गाठींच्या निमिर्तीते उद्दिष्ट खानदेश जिनिंग प्रेसिंग मील ओनर्स असोसिएशनने ठरविले होते. मात्र, अपेक्षीत कापूस न आल्याने केवळ १८ लाख गाठींची निर्मिती झाली. दोन लाख गाठी कमी उत्पादीत झाल्या आहेत.

यंदाची क्वालिटी चांगली

यंदा कापूस उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. बागायती कापूस चांगला आहे. कापसाचा दर्जा चांगल्या क्वालिटीचा आहे. जिरायती कापूसही चांगला येईल. कारण अद्याप बोंड अळीचा शिरकाव झालेला नाही. यामुळे कमी उत्पादन असले, तरी त्याचा दर्जा चांगला राहील. परिणामी भाव चांगला मिळेल. मात्र तो किती मिळेल? हे आताच सांगणे योग्य ठरणार नसल्याचे खानदेश जिनिंग प्रेसिंग मील ओनर्स असोसिएशचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.

Cotton News
Dhule Cotton Disease : कपाशीवर लाल्या रोगाच्या प्रादुर्भावात वाढ; हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com