Jalgaon News : नकली तृतीयपंथीयास मारहाण

beating
beatingesakal

Jalgaon News : शहरातील सागर पार्क मैदानासमोरील महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या भिंतीलगत शनिवारी (ता. २९) सकाळी महिलेच्या वेशातील एका तरुणाला विवस्त्र करून तीन तृतीयपंथीयांनी बेदम मारहाण केली. जवळपास अर्धा-पाऊण तास सुरू असलेल्या मारहाणीबाबत पोलिसांत कुठलीच नोंद झालेली नव्हती. (fake transgender person beaten by transgender jalgaon crime )

रेल्वे जंक्शनमुळे जळगाव शहरात तृतीयपंथीयांची संख्या वाढली आहे. रेल्वेत भिक्षा मागून चरितार्थ चालविणारे, कटलरी, सौंदर्यप्रसाधने विक्री करणारे खरे तृतीयपंथी सोडले, तर काही बनावट तृतीयपंथीयांनी उच्छाद मांडला आहे.

प्रवाशांची जबरी लूट, रेल्वेतील परप्रांतीयांना मारहाण करून सामान पळविणे, अवैध दारू-गांजा, गर्दची विक्री करणाऱ्या बनावट व खऱ्या तृतीयपंथीयांमधील संघर्ष आता टोकावर पोचला आहे. त्यातूनच गोलाणी मार्केट, रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

beating
Unseasonal Rain Crop Damage : वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 312 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

पोलिसांत नोंदच नाही

घडलेल्या प्रकाराचे काहींनी मोबाईलमध्ये चित्रण केले. बराच वेळ या मारहाणीत कोणीही मध्यस्थी केली नाही. मात्र, त्या तरुणाचे रस्त्यावर कपडे फाडले होते. त्याला पळवून पळवून मारहाण सुरू होती.

काहींनी हा प्रकार बघून पोलिसांना फोनही केला. मात्र, रामानंद आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यातून माहिती घेतली असता, अशा कुठल्याही प्रकाराची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

beating
Jalgaon Unseasonal Rain : शिवाजीनगरात भिंत कोसळून सायकलस्वार गंभीर; वाहतूक खोळंबली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com