Jalgaon Crime News : पोलिसांत तक्रार दिल्यावरून कुटुंबीयाला मारहाण | family members beaten up for filing complaint police Jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : पोलिसांत तक्रार दिल्यावरून कुटुंबीयाला मारहाण

Jalgaon News : शहरातील तांबापुरा भागातील ३० वर्षीय महिला व तिच्या सासूला अवैध भंगार व्यवसायिक व त्याच्या गुंडांनी मारहाण केली.

मारहाणीची तक्रार पोलिसांत दिली, म्हणून पुन्हा सायंकाळी घरात घुसून संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. (family members beaten up for filing complaint police Jalgaon news)

घरकाम करणाऱ्या निलोफर इमरान खान (वय ३०) तांबापुरा फुकटपुरा भागात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.

शनिवारी (ता. २७) गल्लीत लहान मुलांचे भांडण सुरू असताना, भंगार व्यवसायिक मोहंमद फैज शेख व त्याच्या मुलाने निलोफर व तिच्या सासूला धक्काबुक्की केली व मारहाण केली, तसेच ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत जखमी सासू-सुनेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास जाते, याचा राग येऊन निलोफर यांचे कुटुंब घरात असताना, गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून पूर्ण कुटुंबीयास लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

जखमींवर जिल्‍हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘माझे पोलिसांशी संबंध आहेत.

माझे कोणी काही करून घेऊ शकत नाही. माझ्या नादाला लागला, त्याला कायमचा संपवून टाकेल’, अशी धमकी भंगार व्यवसायिक देत असल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले.