शेतकऱ्यांची लूट, एजंटांचा गोरख धंदा; आणि शेतकरी संघटनेचा दणका  

शेतकऱ्यांची लूट, एजंटांचा गोरख धंदा; आणि शेतकरी संघटनेचा दणका  

चोपडा : जिल्ह्यात गहू काढणीचा हंगाम सुरू झाला असून बहुतेक शेतकरी हार्वेस्टर मशीनने गहू काढणे पसंद करतात यामुळे कमी वेळेत चांगला, स्वच्छ प्रकारचा गहू यातून निघतो मात्र यात पंजाब राज्यातून आलेल्या हार्वेस्टर चालक व एजंट शेतकऱ्यांकडून एकरी खर्च अव्वाचा सव्वा वसूल करीत असल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे यात एजंटांचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती शेतकरी संघटनेला मिळाली.

शेतकरी संघटनेने हार्वेस्टर चालक यांची तात्काळ मिटिंग बोलावून त्यांच्याशी चर्चा केली शेतकऱ्यांकडून वाजवी दर न घेतल्यास जिल्ह्यात एकही हार्वेस्टर मशीन चालू देणार नाही असा सज्जड दम दिला. शेतकरी संघटनेकडून संबंधितांना दणका देण्यात आल्याने गहू काढण्याचा एकरी दर 1 हजार 800 ते 2 हजार 300 वरून आता एकरी 1 हजार 400 रुपये भाव घेत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली आहे.

हार्वेस्टर चालक, एंजटकडून लुट

जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात गहू काढण्यासाठी पंजाब हरियाणा मधील हार्वेस्टर मशीन दरवर्षी जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतात जिल्ह्यात एकूण 233 मशीन आले आहेत चोपडा तालुक्यात 50 मशीन्स उपलब्ध आहेत तरी एकूण जिल्ह्यामध्ये 283 मशीन गहू काढण्यासाठी उपलब्ध आहेत.गहू काढणीचा हंगाम हा जवळपास मार्च महिन्यापर्यंत चालत राहतो. या मशिन द्वारे गहू काढण्यासाठी शेतकरी एकच गर्दी करतात व याचा फायदा हार्वेस्टर मशीन चालक व शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत रस्ता दाखविणारे,मध्यस्थी करणारे एजंट घेत होते.

शेतकरी संघटनेचा दणका

याची माहिती शेतकरी संघटनेने मिळाली असता शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी हार्वेस्टर चालक यांच्याशी जळगाव येथे व.वा. वाचनालयच्या हॉलमध्ये चर्चा घडवून आणली.यावेळी
या बैठकीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर, चोपडा तालुकाध्यक्ष सचिन सोनवणे,हरियाणा व पंजाब येथील हार्वेस्टिंग मशिन मालक निकेतसिंग चौधरी, प्रेमलाल जाट, रघुवंशी चौधरी, अनुजसिंग आदी उपस्थित होते.या बैठकीत गहू काढण्याचे दर
एकरी 1 हजार 400 रुपये ठरवण्यात आले तसेच विना एजंट गहू काढत असाल तर 1 हजार 300 रुपये एकरा प्रमाणे गहू काढणी रक्कम दयावी.यामुळे जिल्ह्यासह राज्यातील होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबली आहे.

जिल्ह्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शेतकरी हार्वेस्टर मशीन द्वारे गहू काढतात यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी खर्च अव्वाचा सव्वा वसूल केला जात होता ही माहिती मिळाल्यावर हार्वेस्टिंग मशिन मालक यांच्याशी बोलणी करून व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्यात आला.यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबली आहे.

-संदीप पाटील जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com