शेतात काम करीत असतांना बिबट्याने अचानक शेतकऱ्यावर केला हल्ला 

शेतात काम करीत असतांना बिबट्याने अचानक शेतकऱ्यावर केला हल्ला 

साक्री : उंभर्टी ता.साक्री येथे शेतात वडिलांसोबत काम करत असलेल्या महेंद्र सावंत या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला असून, त्यास तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात आणत उपचार करण्यात आले. दरम्यान दिवसाढवळ्या बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून, वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

आवर्जून वाचा- होय..आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी बंडखोरी केली! 


तालुक्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशाच काल दुपारच्या सुमारास उंभर्टी येथे वडिलांसोबत शेतात काम करत असलेल्या महेंद्र सावंत यांना मक्याच्या शेतात बिबट्या दिसून आला. ते वडिलांसह तेथून बाजूला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून पोटावर तसेच पाठीवर बिबट्याने नखांनी वार केल्याने जखम झाली आहे. यावेळी परिसरातील अन्य तरुण धावून आल्याने तिथून बिबट्या पसार झाला, याच तरुणांनी लागलीच महेंद्र सावंत यास साक्री ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून यासंबंधी उपायोजना करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. सततच्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे.
 

संपादन - भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com