Jalgaon News : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer seriously injured in wild boar attack jalgaon news

Jalgaon News : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

अंधारी (जि. जळगाव) : आंबेहोळ (लोंजे) येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

शेतकरी साईदास बालसिंग चव्हाण हे मंगळवारी (ता. २८) नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. (Farmer seriously injured in wild boar attack jalgaon news)

दरम्यान, शेजारील मक्याच्या शेतातून अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ल्या केला. साईदास चव्हाण यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकल्यावर बाजूच्या शेतातील शेतकरी मोतीराम राठोड हे धावत आले व त्यांनी रानडुकरांच्या तावडीतून साईदास यांना सोडवले. तोपर्यंत ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.

रानडुकराने त्यांच्या पाठीच्या मागे, पोटाला व मांडीचे लचके तोडले आहेत. त्यांना चाळीसगाव येथील सर्वज्ञ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा होत असून, उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, वन विभागाचे एस. बी. चव्हाण, माधुरी जाधव, वनरक्षक सरपंच भरत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तसेच ‘उमंग’ महिला परिवाराच्या सपंदा पाटील यांनी रुग्णालयात येऊन चौकाशी केली, तसेच मदतीचे आश्‍वासन दिले.

या वेळी अर्जून परदेशी, अनिल चव्हाण, विजय जाधव, विकास राठोड, गणेश राठोड, नवनाथ चव्हाण, विजय सेरावत, किरण चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान, वन विभागाने रानडुकरांचा बदोबस्त करावा व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonFarmeranimal