Jalgaon Crime : सिव्हील बाहेरुन शेतकऱ्याची दुचाकी लंपास | Farmer two wheeler theft jalgaon crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime : सिव्हील बाहेरुन शेतकऱ्याची दुचाकी लंपास

Jalgaon News : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर पार्किंगमधील शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Farmer two wheeler theft jalgaon crime )

वडाळी (ता. जामनेर) येथील शेतकरी सुधाकर सोपान आवटे (वय ५२) यांच्या नातेवाईकाचा महाराष्ट्र दिनी (ता. १)दुपारी बाराला मृत्यू झाला होता. त्यामुळे श्री. आवटे हे दुचाकी (एमएच १९, सीके १२७५)द्वारे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रुग्णालयात जाताना गेटबाहेरच दुचाकी पार्क करून ते आत गेले. काम अटोपुन परत निघाले असता, त्यांना जागेवर दुचाकी मिळाली नाही. त्यांनी दुचाकीचा जळगाव शहरात इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु, कोणतीही माहिती मिळाली नाही.

अखेर शुक्रवारी (ता. ५) त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक फिरेाज तडवी तपास करीत आहेत.