रेशीम शेतीची कास
रेशीम शेतीची कास sakal

जळगाव : रेशीम शेतीतून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी

जिल्हाधिकारी राऊत; जळके येथील रेशीम शेती प्रकल्पास भेट

जळगाव : रेशीम शेतीची कास धरून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी येथे केले. शनिवारी (ता. ४) जळके (ता. जळगाव) येथील शेतकरी कृषिभूषण राजेश पाटील यांच्या रेशीम शेती प्रकल्पास भेट देऊन केली पाहणी. त्यावेळी ते बोलत होते.

जळके येथील प्रगतशील शेतकरी पाटील यांनी जळके येथे आपल्या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या तुती पिकाची व रेशीम कोष निर्मिती प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी राऊत यांनी केली. तुती लागवड तंत्रज्ञान कोशनिर्मिती याबाबत परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल याबाबत चर्चा केली. यावेळी शेतकरी पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात रेशीम कोष निर्मितीसाठी Chawalky रियरिंग सेंटर व्हावे, याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

रेशीम शेतीची कास
वानखेडेच्या मैदानात एजाजची 'मिजास'; पाहा खास फोटो

कृषि उपसंचालक अनिल भोकरे, प्रगतिशील शेतकरी मधुकर पाटील, नाना पाटील, जळगाव तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष पी. के. पाटील, तालुका कृषि अधिकारी श्रीकांत झांबरे, रेशीम विभागाचे अधिकारी सांगळे, कृषी पर्यवेक्षक शरद पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वावडदा येथील शेतकरी यशवंत पाटील यांनी पोकरा योजनेअंतर्गत उभारलेल्या शेडनेट हाऊसची पाहणी केली. ते उत्पन्न घेत असलेल्या भाजीपाला व वेलवर्गीय पिकाबाबतची माहिती जाणून घेतली. विकेल ते पिकेल अभियानांतर्गत त्यांच्या विक्री केंद्रास भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com