पावसाची चाहुल..आणि शेतकरी शेतात; नांगरणी, वखरणीस सुरवात !

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी खरिप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली
farming work
farming workfarming work

जळगाव ः गेल्या रविवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने (Rain) चांगलीच हजेरी लावली. गेल्या देान दिवसांपासून तापमानात घसरण (Falling in temperature) होवून ढगाळ वातावरण (Cloudy) आहे. केव्हा पाऊस येईल हे सांगता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी (farmer) शेतात वखरणी, नांगरणीची कामे सुरू केली आहेत. दुसरीकडे खते, बियाण्यांची (seed) कमतरता भासू नये यासाठी खरिपाच्या बियाण्यांची मागणीही नोंदविण्यात आली आहे.

(jalgaon disctric rain com and farmer farming work start)

farming work
पाणी टंचाईच्या वाडी-वस्त्यांसाठी 'स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना'

पावसाळा सुरू होण्यास अजून दहा ते पंधरा दिवसांचा अवधी आहे. जून महिन्यात मान्सून वेळेवर सुरुवात होईल,असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे तौत्के वादळामुळे जिल्ह्यात काही ठिकाण मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी खरिप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत.

बियाण्यांची कमतरता भासणार नाही

जिल्ह्यात यावर्षी पेरणीलायक क्षेत्राचा अंदाजानुसार आगामी खरीप पेरणीच्या पार्श्‍वभूमीवर बी- बियाण्यांसह रासायनिक खते उर्वरकांचे नियोजनासह मागणी नोंदविण्यात आली असून खते व बियाण्यांची खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, याचे देखिल नियोजन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

farming work
बंदी ! तरी..तणनाशक रोधक कापसाच्या बियाण्याची विक्री

७ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात ७ लाख ५० हजार हेक्टरच्या वर पेरणी लायक क्षेत्र आहे. त्यापैकी ऊस व केळी बागायत क्षेत्र वगळता या हंगामात ७ लाख ३० हजार २७० हेक्टरवर खरिपासाठी पेरणी क्षेत्राच्या अंदाजानुसार बियाण्यांचे नियोजन करण्यात आहे. कपाशीच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांची सरासरी पाहता ११ हजार १५३ हेक्टर क्षेत्रात कपाशी वाणांची लागवड झाली होती. त्यानुसार यावर्षी वाढत्या क्षेत्राचा अंदाज घेऊन ७२५० हेक्टर क्षेत्रासाठी १६३ क्विंटल संकरित कापूस तर ५ लाख २० हजार ४०० हेक्टर क्षेत्रानुसार ११७०९ बी.टी बियाणे, मका ८३९१७ हेक्टर क्षेत्रासाठी १२५८८ क्विंटल, उडिद २१७५० हेक्टर क्षेत्रावर ११४२ क्विंटल, मुग २६,९९२ हेक्टरसाठी ८५० तर तूर पिकासाठी १३ हजार २८० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी तूर व सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीन व तूर उत्पन्न वाढीचा शेतकऱ्यांचा कल लक्षात घेता बियाणे नियोजन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com