Fine Recovery News : रेल्वेकडून 2 दिवसांत 3 लाखांचा दंड वसूल

Jalgaon: Railway employees conducting ticket checking campaign.
Jalgaon: Railway employees conducting ticket checking campaign.esakal

Jalgaon News : विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वाणिज्य व प्रबंधक (तिकीट तपासणी) आर. डी. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली टिकिट तपासणी मोहीम दोन दिवस राबवण्यात आली.

त्याद्वारे २ लाख ९८ हजार ९८५ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. चाळीसगाव-धुळे विभागाला ९ तिकीट तपासणी कर्मचारी आणि २ आरपीएफ कर्मचारी असलेल्या ९६ प्रकरणांमधून ४३ हजार ४३५ रूपये दंड वसूल करण्यात आला. (Fine Recovery News 3 lakh fine recovered from Railways in 2 days Jalgaon News)

१८ मेस १५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि स्टेशन आरपीएफ कर्मचारी यांनी भुसावळ स्थानकावर तपासणी केली.

त्यांनी भुसावळ स्थानकावर ३१४ प्रकरणे तयार केली. त्यातून २ लाख ३५ हजार ५५० रुपयांचा महसूल मिळवला. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक क्षीरसागर व सहायक वाणिज्य प्रबंधक (कोचिंग), विभागीय तिकीट तपासणी निरीक्षक पवार दोन दिवस तपासणी करत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Railway employees conducting ticket checking campaign.
Crime News: 'सुट्टीसाठी गावावरून आणलं अन्...' वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com