Jalgaon News : साई कॉम्प्युटरला आग, 8 लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burned material from sai computers

Jalgaon News : साई कॉम्प्युटरला आग, 8 लाखांचे नुकसान

पाचोरा (जि. जळगाव) : येथील जामनेरवरील सु. भा. पाटील व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर असलेल्या साई कॉम्प्युटर या दुकानास भर दुपारी आग (Fire) लागून त्यात सुमारे आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. (fire in shop of Sai Computer and 8 lakhs worth of material got burnt jalgaon news)

उमेश राऊत यांच्या मालकीच्या साई कॉम्प्युटर्समध्ये संगणक, लॅपटॉप, प्रिंटर यासह संगणकाचे सुटे भाग विक्री व दुरुस्तीचे काम केले जात होते.

या दुकानास लागून त्यात संगणक, लॅपटॉप, प्रिंटर यासह इतर साहित्य, फर्निचर, एसी जळून सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. संकुलातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पाचोरा पालिकेचा अग्निशामक बंब बाहेरगावी असल्याने पालिकेची अग्निशमन सेवा मिळू शकली नाही. त्यामुळे नुकसान जास्त झाल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.