
खडसेंना ED कडून नोटीस
मुंबई : भोसरीतील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसेंसह त्यांच्या पत्नी व जावयाविरुद्धच्या कारवाईत ‘ईडी’ने याआधी जप्त केलेल्या मालमत्ता रिक्त करण्याबाबत खडसेंना नोटीस बजावली आहे.
भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदीत पदाचा गैरवापर व बनावट कंपन्यांद्वारे पैसा फिरवून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ‘ईडी’ने (ED) एकनाथ खडसेंसह (Eknath Khadse) त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गिरीश चौधरी या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अद्यापही जामिन मिळू शकलेला नाही. मंदाकिनी खडसेंसह स्वत: एकनाथ खडसेंवर अटकेची कारवाई करू नये यासंबंधी निर्देश देत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा: राहुल गांधी परदेशात; ईडी चौकशीसाठी मुदत वाढवून मागणार
दरम्यान, या प्रकरणात ‘ईडी’ने याआधीच खडसे, विशेषतः: मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावे असलेल्या जळगाव, पुणे, नाशिक येथील मालमत्ता जप्त (ॲटच) केल्या आहेत. आता या मालमत्ता खाली करण्यासंबंधी त्यांना नोटीस बजावण्यात आल्याने खडसेंसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा: अविनाश भोसलेंना ED चाही दणका; पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस
Web Title: Former Minister Eknath Khadse Has Been Issued A Notice By The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..