
Jalgaon News : तलवारीसह नाचणे चौघांना पडले महागात...
Jalgaon News : तलवार घेऊन वरातीत नाचणाऱ्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी कसाली मोहल्ल्यात दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील एक एक संशयितास अटक करण्यात आली. ( four who danced with swords were arrested jalgaon news )
कसाली मोहल्ल्यात मंगळवारी (ता.१६) दुपारी अडीचच्या सुमारास नवरदेवासह तिघांनी चिथावणीखोर गाण्यावर तलवारी हातात धरून नाच केला. परिसरात दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता बळावली होती. वेळीच पोलिस पोहचल्याने वरात पुढे नेण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी किरण गोपाळ कोळी (वय २४), विकी भाऊलाल कोळी (वय २७) आणि डीजे मालक यशवंत शांताराम शिंगाणे (वय २७) यांना पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलिस कर्मचारी संजय पाटील यांनी सायंकाळी अटक केली. चामुंडा डीजे, तलवारी आदी साहित्य जप्त करण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दुसऱ्या दिवशी १७ ला नवरदेव विकी गोपाळ कोळी (वय २५) याला देखील अटक केली. सर्व संशयिताना पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील, कमलेश बाविस्कर, अमोल देशमुख, घनश्याम पवार, नरेंद्र बडगुजर यांनी न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एस. अग्रवाल यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यानंतर संशयितांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी कसाली मोहल्ल्यात झालेल्या दोन गटातील दगडफेकीतील संशयित विशाल दशरथ चौधरी (वय २७) व अब्बासखान हुसेन (वय ५२) यांनाही पोलिसांनी अटक केली व पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख यांनी न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एस. अग्रवाल यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.