Jalgaon Crime News : Truckभाड्यासह इंधनापोटी 28 लाखांचा गंडा

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : मालवाहू ट्रक ट्रान्सपोर्टसाठी भाड्याने लावल्याचे दाखवून वाहनातील इंधन व भाड्यापोटी बीएलआर लॉजिस्टिक इंडिया कंपनीची तब्बल २८ लाख ६३ हजार ७७५ रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सात महिन्यांपूर्वी (३० मे २०२२) घडलेल्या या फसवणुकीविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

लोखिंदर मोहरसिंग (सद्‌गुरूनगर, एमआयडीसी जळगाव) याने प्रीती कार्गो डीस मुव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनी (ब्लॉक क्रमांक १, प्लॉट क्रमांक १, सर्वे नंबर ७५), जगवानी, एमआयडीसी जळगाव, श्री करणी ट्रेलर सर्विस कंपनी (शॉप नंबर ४, प्लॉट नंबर १५९७) प्रताप हॉटेलजवळ, नाशिक, श्री-०१ करणी ट्रान्स लाईन कंपनी (प्लॉट नंबर १६, सद्‌गुरूनगर), सागर शॉप आयोध्यानगर, जळगाव, एस. आर. लॉजिस्टिक कंपनी (प्लॉट नंबर सी-७, गिरनार ट्रान्सपोर्ट गुदाम, बालाणी लॉन्स जवळ, एमआयडीसी जळगाव) या विविध चार ट्रॉन्स्पोर्ट सर्व्हिससाठी ट्रक-कंटेनर पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या गाड्या ट्रान्स्पोर्टसाठी लावल्याचे दाखविले. (Fuel including truck fare Topic BLR Logistics India Company fraud of Rs 28 lakh 63 thousand 775 Jalgaon Crime News)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Crime News
Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा

नंतर या गाड्यांचे भाडे देण्याबाबत लोखिंदर मोहरसिंगने त्याचे लॉगीन आयडी बीशून्य०३७१ वरून कंपनीस खोटी रिक्वेस्ट आर. लॉजिकने पाठवून वेळोवेळी कंपनीकडून गाडी भाड्यापोटी २६ लाख ३० हजार २०० रुपये व डिझेल भरण्यासाठी ९३ हजार रुपये व सिद्धार्थ ट्रान्स्पोर्ट, सिवाच रोड लाईन, गोगाजी कॅरिअरचे या कंपन्याचे भाडे १ लाख ४० हजार ५७५ रुपये, कंपनीच्या बीपीसीएल कार्डमधून अदा केल्याचे दाखवून ते कंपनीला न देता बीएलआर लॉजिस्टिक इंडिया एलटीडी कंपनीची एकूण २८ लाख ६३ हजार ७७५ रुपयांत फसवणूक केली.

फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधिताला याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत अखेर सोमवारी (ता. २६) बीएलआर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे व्यवस्थापक मुकुल प्रेमकुमार शर्मा (वय ३५, रा. अयोध्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत लोखिंदर मोहरसिंगविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.

Crime News
Nashik News : थर्टीफर्स्टसाठी 7 लाख मद्यपींनी घेतले परवाने; नववर्षांसाठी 3 दिवसातील विक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com